loader
Breaking News
Breaking News
Foto

मातृत्व आधार फाउंडेशनतर्फे नवदुर्गांचे पूजन

मालवण (प्रतिनिधी) - आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या कुटुंबाचे हित दडलेले आहे. आपल्या मुलांच्या संगोपनामध्ये त्यांच्या वयाचा ७ ते १३ या वर्षातील काळ महत्वाचा आहे. मुले ही अनुकरणाने शिकत असतात. शिस्त आणि स्वातंत्र्य हे मुलांच्या शिकवणीत महत्त्वाचे आहे. पालकांनी सजग होणे आवश्यक आहे. सात च्या आत घरात ही आपल्या पूर्वजांची शिकवण आपण विसरत चाललो आहोत. संस्कारी स्त्रियाच संस्कारी समाज निर्माण करू शकतात, असे प्रतिपादन डॉ. राहुल पंतवालावलकर यांनी येथे बोलताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मातृत्व आधार फाउंडेशनाच्या वतीने वायरी भूतनाथ येथे नवदुर्गा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फाउंडेशनच्या वतीने नवरात्रौत्सवातील नऊ दिवस सत्कार करण्यात आलेल्या नऊ कर्तृत्ववान महिलांचे पूजन करण्यात आले. तसेच विधवा महिलांचा साडी - चोळी व नारळाने ओटी भरून सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर डॉ. राहुल पंतवलावकर, सानिका केअर सेंटरच्या सानिका तुळसकर, ज्येष्ठ लेखिका वैशाली पंडित, माजी नगरसेवक महेश कांदळगावकर, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे, प्रा. रामचंद्र काटकर, पर्यटन व्यावसायिक बाबू बिरमोळे, वायरी भूतनाथच्या उपसरपंच प्राची माणगावकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा तसेच पर्यावरणीय क्षेत्रात लिखाण केल्याबद्दल संदीप बोडवे यांचा फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. राहुल पंतवालावकर यांनी कुटुंब व्यवस्था तसेच संस्कार, आरोग्य, आहार आणि व्यसनाधिनतेवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg