loader
Breaking News
Breaking News
Foto

लवेल येथील जीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात अँटी रॅगिंग कमिटीची बैठक

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अँटी रॅगिंग कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कमिटीचे कायदेशीर सल्लागार ऍड. क्षितिज दामले यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंग म्हणजे काय, त्याचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात, तसेच कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी याबाबत माहिती दिली. रॅगिंगसारख्या प्रकारांना महाविद्यालयात अजिबात स्थान नाही आणि अशा घटना घडल्यास कठोर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चंद्रकांत बनकर यांनी सामाजिक भान जपण्याचे आणि परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण ठेवण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्त्या दीप्ती सावंत यांनीही विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने वागण्याचे तसेच समस्या आल्यास कमिटीशी संपर्क साधण्याचे मार्गदर्शन केले. घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये राज्यभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या सर्वांना सुरक्षित, सकारात्मक आणि खेळीमेळीचे वातावरण मिळावे यासाठी महाविद्यालय प्रशासन व अँटी रॅगिंग कमिटी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीस चेअरमन डॉ. पाटील, नोडल ऑफिसर प्रा. व्ही. आर. कासार, प्रा. एस. सी. मुनघाटे, डॉ. बी. आर. शितलकर, डॉ. एस. आर. जाधव, एस. एस. गुहागरकर, प्रदीप मायनाक, ऍड. क्षितिज दामले, पत्रकार चंद्रकांत बनकर, सामाजिक कार्यकर्त्या दीप्ती सावंत, प्रकाश कदम, शिवराज पवार व साक्षी खापरे आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg