loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई स्थित, सकल फोंडके पाटील मराठा समाजाचे परेल येथे दसरा संमेलन उत्सहात

वैभववाडी (प्रतिनिधी) - गुरुवार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:३० वा. या वेळेत फोंडके पाटील मराठा समाज मौजे हेत चे मुंबई स्थित सर्व ग्रामस्थ एकत्र येत डॉ. शिरोडकर हॉल येथे मोठ्या थाटामाटात, उत्साहात दसरा संमेलन यशस्वी केले. हेत गावातील फोंडके पाटील समाजाची स्थापना सन १९७० साली झाली आहे. जवळ जवळ ९० टक्के तरुण मंडळी मुबई येथे कामानिमित्त वास्तव्यात आहेत. जवळ जवळ ३०० च्या वरती तरुण व्हॉटअँप माध्यम आणि फोन संपर्कातून एकत्र येत मौजे हेत, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग गावातील फोंडके पाटील मराठा समाजाचे एकत्रीकरण, समाजातील व गावातील सर्वांचा सर्वांगीण विकास या धोरणातून एकत्र येत दसरा संमेलन केले. दसरा संमेलनासाठी फोंडके मंडळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मौजे हेत गावचे ग्रामदैवत श्रीदेव केदारलिंगप्रती श्रीफळ ठेऊन व आशीर्वाद घेऊन, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात कार्यक्रमाला सुरवात केली. तरुण सदस्यांनी समाजाच्या विकासासाठी व हेत गावच्या उन्नतीसाठीचे आपआपले विचार मांडले. मुंबई व गावात कार्यरत राहण्यासाठी नवीन कार्यकारणी स्थापना करण्यात आली, कार्यकारणीतील नवीन सदस्य यांना त्यांच्या यशस्वी वाटचालीस सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्या दिल्या गेल्या. गावातील सर्वच समाजाला एकत्र घेऊन सकल समाजाची व गावाची उन्नती करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला. सर्व फोंडके मंडळीने एकमेकांची गळाभेट घेत दसर्‍याचे सोने लुटले. एकमेकांना गोड खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg