रत्नागिरी (वार्ताहर) : सोशल मीडियावर दुसर्यांचे स्टेट्स बघण्याऐवजी स्वतःचे सोशल स्टेट्स घडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही कर्म करत नाही तोपर्यंत यश मिळणार नाही, असे मार्गदर्शन डॉ. अमित बागवे यांनी केले. क्षत्रिय मराठा मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. बागवे यांनी तरूण पिढी, उद्योग व्यवसाय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमधील गुंतवणूक यावरही मार्गदर्शन केले. मराठी उद्योजकांचे ब्रँड पुढे आणत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, मराठ्यांना आरक्षण मिळेल, पण राज्यात आपण ४० टक्के आहोत, पण प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणार नाही. सध्या कंत्राटी कामगार वाढलेत. त्यामुळे ४ कोटी समाजाला हा फायदा मिळेल का? काही जण पुढे जातील, बाकीच्यांनी व्यवसायात आले पाहिजे. मराठा म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आले पाहिजे.
एआयमुळे नोकर्या जाणार आहेत, पण तुम्ही ते शिकून घेतले, तर तुम्ही पुढे जाल. जागतिक मराठा समाज संघटना काढूया. त्यासाठी अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांच्यासारख्यांनी मदत करावी. अन्य समाजाच्या सुद्धा अशा संस्था आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अध्यक्षीय भाषणात मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे म्हणाले की, क्षत्रिय मराठा मंडळाचे १८ वर्षे काम जोमाने सुरू आहे. अखिल मराठा संमेलन रत्नागिरीत उत्साहात झाले. मराठा भवन आणि श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर उभे करण्याचे स्वप्न पाहिले असून ते लवकर होईल. त्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे. प्रास्ताविक करताना प्राची शिंदे यांनी सांगितले की, एकत्र येणे हे आजच्या पिढीला आवश्यक आहे. याप्रसंगी कार्याध्यक्ष राकेश नलावडे आणि प्रचार प्रमुख संतोष तावडे यांनीही मनोगत व्यक्त करताना मराठा मंडळींनी एकत्र राहिले पाहिजे व आपले व्यवसाय उद्योग वाढवले पाहिजेत असे स्पष्ट सांगितले. कार्यक्रमात सीईटी, नीट, जेईई या परीक्षेमधील गुणवंत, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक आणि एनएमएमएस परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, राष्ट्रीय पातळीवर यशस्वी, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले. मराठा समाजातील ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरीकांना सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमही रंगले. लकी ड्रॉमधील विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यामध्ये सायकल, ओव्हन आणि अन्य विविध बक्षिसांचा समावेश होता. वर्धापनदिनानिमित्त कुलस्वामिनी माता श्री तुळजाभवानीची पूजा करण्यात आली. संध्या नाईक यांनी गणेश वंदना सादर केली. सूत्रसंचालन अमित कदम यांनी ओघवत्या शैलीत व सुरेखरित्या केले. कौस्तुभ सावंत यांनी आभार मानले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.