loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय निवड चाचणीमध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे च्या १७ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

काल वाटद खंडाळा येथे झालेल्या जिल्हा असोसियेशन सब ज्युनियर Dodgeball जिल्हास्तरीय निवड चाचणी मध्ये दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे च्या ८ मुलगे आणि ६ मुलींची एकूण १७ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेचे कुमारी नंदिनी रवींद्र जाधव, धनश्री नारायण बळकटे, अक्षरा विनोद झर्वे, अन्वया निलेश पावरी, सई देवचंद्र पावरी आणि श्रुतिका सुरेश निवेंडकर या मुली तसेच कुमार रुद्र महेंद्र जाधव, श्रवण मनोज जाधव, पूजन रमेश धातकर, वेदांत सहदेव धातकर, आरव अविनाश जाधव, ऋग्वेद मोरेश्वर झर्वे, शुभम विनोद जाधव आणि प्रेम मोहन पवार अशा ८ मुलांची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रती वर्षाप्रमाणे राज्यस्तरावर धडकण्याची दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेने परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धा दि. २६, २७ आणि २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे पार पडणार आहेत. आणि या स्पर्धामधुन यातील काही विद्यार्थ्याना राष्ट्रीय स्तरावर निवड होण्याची संधी भेटणार आहे. तरी प्रशालेचे, मुख्याध्यापक कोळेकर, क्रीडा शिक्षिका ऋतुजा जाधव निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे संस्थेतर्फे कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी घुमटकर ग्रुप तर्फे खूप शुभेच्छा.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg