loader
Breaking News
Breaking News
Foto

जामगे येथील मातोश्री वृद्धाश्रमात खास आजी आजोबांसाठी संगीत मैफिलीचे आयोजन

खेड (दिलीप देवळेकर)- लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने दिनांक ५ ऑक्टोंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता खेड जामगे येथील मातोश्री वृद्धाश्रमात खास आजी आजोबांसाठी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. लायन्सच्या सभासदांनी विविध अशी सुंदर गाणी कराओके वर सादर करत उपस्थित आजी-आजोबांची मने जिंकली तसेच आजी-आजोबांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या संगीत मैफील मध्ये सहभाग घेत गाणी सादर करत मनसोक्तपणे लायन्स मेंबरने गायलेल्या गाण्यावर ठेका धरला व काही क्षण का होईना ते आपले सर्व दुःख विसरून या संगीत मैफिलीमध्ये मंत्रमुग्ध होऊन नाचले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लायन्स क्लबचा हा स्तुत्य उपक्रम वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना खूप भावला व बऱ्याच वर्षांनी तुमच्यामुळे आमच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झाले. आम्ही भक्तीमय वातावरणात तसेच जुन्या आठवणीत रमलो गेलो त्याबद्दल लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. या संगीत मैफिलीसाठी विशेष अशी ज्यांनी साथ दिली ते लायन राकेश जैन, अनिल मोरे, बापू शीलेवंत, अविनाश दळवी, शैलेश धारिया, अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी ही संगीत मैफिल आयोजित केल्याबद्दल मातोश्री संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg