वैभववाडी (प्रतिनिधी)- आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग यांच्या वतीने पी.एम.उषा योजनेअंतर्गत एक दिवसीय इंडस्ट्रियल फिश फार्मिंग ट्रेनिंग कार्यशाळा दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक डॉ. मनोज घुगुसकर यांनी विद्यार्थ्यांना शोभिवंत मत्स्य पालन, खेकडा पालन करणे, तसेच रोहू कटला व म्रिगल या भारतीय माशांचे पालन कशा प्रकारे करावे ? त्यातून कशा पद्धतीने व्यवसाय निर्माण करता येईल ? याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच प्रमुख मार्गदर्शक कृपेश सावंत यांनी मत्स्य व्यवसाय उभा करत असताना शासन कशाप्रकारे मदत करते ? शासनाच्या वेगवेगळ्या योजना कोणत्या आहेत ? या योजनांचा लाभ कसा घ्यावा ? याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सहसचिव विजय रावराणे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सध्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेचे विश्वस्त शरदचंद्र रावराणे यांनी या कार्यशाळेत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या स्थानिक समितीचे सचिव प्रमोद रावराणे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही गवळी, कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एन. आर. हेदूळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला यामध्ये देवगड महाविद्यालय, दळवी महाविद्यालय तळेरे, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, कृषी महाविद्यालय सांगुळवाडी व आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता.
समारोपाच्या सत्रामध्ये माजी विद्यार्थिनी अश्विनी सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रतिनिधींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉ. डी.एम. सिरसट यांनी विद्यार्थ्यांना मत्स्यपालन व्यवसाय स्वतः उभा करण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्निल होळकर, मॉडर्न कॉलेज तळेरेचे प्रा.डॉ. प्रशांत हातकर, माजी वरिष्ठ लिपिक अरुण जैतापकर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राध्यापक निलेश कारेकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अजित दिघे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राणीशास्त्र विभागाच्या डॉ. दर्शना कोरगावकर व डॉ. आरती भारमल यांनी परिश्रम घेतले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.