वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी आणि त्याचा घरसंसार व पशुधन उध्वस्त झाले असल्यामुळे शेतक-यांना राज्य सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात देणेबाबत गुहागर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. कित्येकांची घरे देखील जमीनदोस्त झालेली आहेत. संसाराला लागणारी भांडीकुंडी तसेच पशुधन देखील वाहून गेलेली आहेत. त्यामुळे बळीराजाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. ओला दुष्काळसदृश्य परिस्थीती निर्माण झाल्यामुळे शेतक-यांनी शेतीसाठी काढलेली कर्जेदेखील भरणे शक्य नाही. महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात विदर्भ, मराठवाडा व कोकण मिळून ६ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे. कोकणामध्ये १५ मे २०२५ नंतर आजपर्यंत असा एकही दिवस गेला नाही की पाऊस पडला नाही आजतगायत पाऊस सुरूच आहे.
वातावरणातील बदल पाहीले तर अजून काही दिवस पाऊस सूरूच राहू शकतो. त्यामुळे कोकणातील विशेषतः आंबा, काजू, कोकम आणि फणस या पिकांना मोठा फटका बसू शकतो. यावर देखील तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही खालील मागण्या करीत आहोत. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतक-यांना हेक्टरी रूपये ५० हजार इतकी थेट आर्थिक मदत त्वरीत जाहीर करावी. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतक-यांचे संपूर्ण कर्जमुक्त करावे.पीक विम्याचे कठीण निकष पूर्ववत करून विम्याची रक्कम त्वरीत शेतक-यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरीत देण्यात यावा.
वरील सर्व मागण्यांचा महाराष्ट्र राज्य सरकारने गांभियनि विचार करून त्वरीत शेतक-यांना मदतीचा हात दयावा, ही विनंतीही शेवटी करण्यात आली आहे. या निवेदनावर शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख सचिन चंद्रकांत बाईत , उप तालुका प्रमुख काशिनाथ मोहिते, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी सभापती पांडुरंग कापले, युवक तालुकाप्रमुख इम्रान घारे, सचिन जाधव, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, स्नेहा भागडे, शहर प्रमुख सिद्धिविनायक जाधव, पारिजात कांबळे, गुहागर शहर प्रमुख राज विखारे, पराग मालप, आरे सरपंच समित घाणेकर, सतीश शेटे, सतीश मोरे, सुरज सुर्वे, सोहम सातर्डेकर, सुधाकर सांगळे, सिद्धी सुर्वे, शृंगारतळी शहर प्रमुख मुखतार ठाकूर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.