loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रा.पं. उमराठ व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उमराठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत उमराठ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उमराठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान व अ‍ॅनिमीया मुक्त अभियान नुकतेच श्री नवलाई देवीची सहाण येथे संपन्न झाले. या अभियानाचे उद्घाटन ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर अभियानाप्रसंगी डोळे व दंत चिकित्सा करणारे नॅब आय हॉस्पिटलचे डॉ. जोशी, जनरल तपासणीसाठी तालुका आरोग्य विभागाचे मोबाईल व्हॅन पथकचे डॉ. वैभव तोंडे, फार्मसिस्ट प्रजोत नरोटे आणि सहकारी, सरपंच जनार्दन आंबेकर, उपसरपंच सुरज घाडे, ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यांसह उमराठ शाळा नं. १ चे मुख्याध्यापक प्रकाश नाटेकर, उपशिक्षक नागरगोजे, पोलीस पाटील वासंती आंबेकर, माजी पोलीस पाटील महादेव आंबेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, जेष्ठ नागरिक कुंदन कदम, नामदेव पवार, शशिकांत पवार, पुणाजी गावणंग, देवजी गोरिवले, शांताराम गोरिवले, अशोक जालगावकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष संदीप गोरिवले तसेच आरोग्य सहाय्यक दत्तात्रय मुद्दामवार, आरोग्य सहायिका लक्ष्मी बिर्जे, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, प्रशिका थोरात, शीतल खोले, विवेक पाटीदार, आरोग्य सेविका दीपा असगोलकर, अंकिता पालकर, रूपम जाधव, आरोग्य सेवक यदनेश कुलकर्णी, सुनील उंडे, ऋषिकेश पाटील, फ्लेबोटोमिस्ट स्वपन्जा तोडणकर, आशा गट प्रवर्तक साक्षी जाधव, आशा स्वयंसेविका वर्षा गावणंग, रुचिता कदम, पूजा माटल, विजया ढोरलेकर, अंगणवाडी सेविका वर्षा पवार, सारिका धनावडे, राधा आंबेकर, अंगणवाडी मदतनीस जिया पवार, मयुरी गोरिवले इत्यादी सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

सदरचे अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, उमराठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे तसेच ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम, साईस दवंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचे तसेच शिबीरात सहभागी होऊन विविध तपासणी करून घेतल्या बद्दल उमराठचे सरपंच यांनी सर्व ग्रामस्थांचे कौतुक करून आभारही मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg