loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचे यश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व तु.पुं शेटेये कनिष्ठ महाविद्यालय व का.रा कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूल मधील विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर लांजा येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत नेत्र दीपक यश मिळवले. यामध्ये १४ वर्ष वयोगटातील विद्यार्थी सार्थक घडशी ८० मीटर अडथळा प्रथम, श्रेया घडशी १०० मीटर धावणे प्रथम, असीत जाधव ६०० मीटर धावणे द्वितीय, श्रेया घडशी २०० मीटर धावणे प्रथम, पियुष बाणे ११० मीटर अडथळा तृतीय, नेत्रा जाधव ४०० मीटर धावणे तृतीय. १४ वर्षे मुले ४* १०० रिले प्रथम, १४ वर्षे मुली ४*१०० रिले द्वितीय, १९ वर्ष वयोगट स्वरूप शिंदे ४०० मीटर अडथळा प्रथम, पंकज गाडे उंचउडी द्वितीय, स्वरूप शिंदे ११० मीटर अडथळा द्वितीय, तनिष घडशी उंचउडी तृतीय, १९ वर्ष मुले ४००*१०० प्रथम, १९ वर्ष मुली ४* १०० द्वितीय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१ ऑक्टोबर रोजी झालेल्या १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थी आर्यन राहुल पडवणकर १०० मीटर धावण प्रथम, निखिल नागेश कुळये ५ किमी चालणे प्रथम, साहिल संतोष शिगम ८००मी. धावणे द्वितीय, शुभम शशिकांत कांबळे ३ किमी धावणे द्वितीय, तेजस सुरेश घडशी,४०० मी. अडथळा शर्यत द्वितीय, सानिका भिकाजी चव्हाण ३०० मी धावणे द्वितीय क्रमांक, पायल जयराम मांडवकर ३००मी. धावणे प्रथम, सलोनी संदीप शिगम ३ किमी चालणे प्रथम, दिव्या प्रकाश आग्रे ८००मी धावणे द्वितीय क्रमांक, साहिल संतोष शिगम, ४०० अडथळा शर्यत प्रथम क्रमांक आर्या गुरव, ११० अडथळा द्वितीय क्रमांक, सुजला संदीप शिगम ११० अडथळा तृतीय, शुभम पालकर २००मी तृतीय. ४*१०० रिले मुले द्वितीय क्रमांक ४*४०० रिले मुली द्वितीय क्रमांक १६.४*४०० रिले मुले द्वितीय क्रमांक. प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सचिन कांबळे व श्री निलेश कुळ्ये यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेचे मुख्याध्यापक अरुण डोळे, शाळा व्यवस्थापन समिती, संस्थेचे संचालक मंडळ व शिक्षक पालक यांच्याकडून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg