loader
Breaking News
Breaking News
Foto

भोमडी येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात

दापोली (प्रतिनिधी) - भोमडी येथे वर्षावास हा बौद्ध धर्मियांचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. वर्षावासाच्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या धर्मबांधवांसह सर्वसामान्यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी होवून आपला आनंद व्दिगुणित केला. दापोली तालुक्यात कार्यरत असलेल्या भारतीय बौद्धमहासभा शाखा क्रमांक १४ गाव भोमडी यांच्या माध्यमातून भोमडी येथील समाज मंदिरात आयु. चंद्रमणी घाडगे यांच्या अध्यक्षते संपन्न झालेल्या वर्षावास या कार्यक्रमात रत्नागिरी येथील सुप्रसिध्द प्रवचनकार आयु. एन.बी.कदम गुरुजी याचे मार्गदर्शनपर प्रवचन झाले या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांसह दापोली तालुक्यातील गावागावांतील समाज बांधव तसेच भारतीय बौद्धमहासभेचे प्रमुख पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये आयु.अनिल घाटगे (अध्यक्ष भारती बौध्दमहासभा), आयु.अशोक जाधव (बौध्द महासभा तालुका सचिव ), आनंद जाधव (कोषाध्यक्ष), अनंत शेळके (संस्कार सचीव दापोली), मुकुंद कासारे (हिशोब तपासणी), संदिप धोत्रे (जिल्हा संघटक), सुनिल धोत्रे (जिल्हा संघटक) अ‍ॅड संदेश उर्फ नाना मोरे , स्वागताध्यक्ष सुधिर घाडगे, पवन धोत्रे (दापोली तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), संतोष काणेकर (भोमडी पोलिस पाटील), विजय घाडगे, सुधीर मोहिते, संतोष धोत्रे, मिलिंद घाटगे, सुधाकर घाडगे, मनोहर घाडगे, भिकू सकपाळ आदी मान्यवरांचा यात समावेश होता. वर्षावास ही बौद्ध परंपरेतील एक महत्त्वाची धार्मिक साधना आहे. ’वर्षावास’म्हणजे’पावसाळ्यातील वास्तव्य’. ही परंपरा भगवान गौतम बुद्धांनी स्थापन केली होती. पावसाळ्यात भिक्षु एका ठिकाणी स्थिर राहून ध्यान, वाचन, उपदेश आणि साधना करतात.

टाईम्स स्पेशल

असा हा एक धार्मिक कार्यक्रम आहे. हा धार्मिक कार्यक्रम आजही त्याच भावनेने आणि श्रध्देने भारतासह थायलंड, श्रीलंका, म्यानमार इत्यादी देशातील बौध्द विहारांमध्ये वर्षावासाची परंपरा श्रध्देने चालू आहे. भारतात मुंबई, पूणे, नागपूर, औरंगाबाद या सारख्या ठिकाणी अनेक विहारांमध्ये वर्षावास साधनेचे कार्यक्रम साजरे होतात. वर्षावास ही केवळ एक परंपरा नाही तर आत्मशुध्दी ध्यान, अनुशासन व समाजसेवेचा एक सुंदर संयोग आहे. वर्षावास ही बौध्द परंपरेतील एक महत्वाची धार्मिक साधना आहे. अशा या धार्मिक वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन भोमडी येथे करण्यात आले होते. एका छोटेखानी गावात महत्वाच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून भारतीय बौद्धमहासभा शाखा क्रमांक १४ गाव भोमडी या गावाने आपली धार्मिक कर्तव्य पार पाडली. अशा या कार्यक्रमाचे आपल्या ओघवत्या शैलीत आयु.अतिष घाडगे तसेच आयु. किशोर घाडगे यांनी उत्कृष्ट असे सुत्रसंचलन केले. तर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आयु. संतोष घाडगे यांनी पार पाडला. हा वर्षावासाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्धमहासभा शाखा क्रमांक १४ गाव भोमडी येथील सभासदांनी प्रचंड मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg