दापोली, (वार्ताहर) : आमदार, खासदार हे सगळे पाण्यावरचा बुडबुडा आहे, शाश्वत नाही, माणसातील संवेदनशीलता हीच केवळ शाश्वत असल्याने प्रत्येक माणसाने त्याच्या त्याच्या क्षमतेने त्याच्या आयुष्यात एक छोटीशी जगण्यातील संवेदनशीतलता जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी दापोली येथे केले.
भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने सेवा पंधरवड्या निमित्त “प्रबुद्ध संवाद” या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात “सामाजिक जीवनातील संवेदनशीलता” या विषयावर आ. श्रीकांत भारतीय बोलत होते, ते म्हणाले, कुठलेही छोटेसे काम घ्या पण ते आयुष्यभर करा. अनाथालयामध्ये वयाच्या १८ वर्षापर्यंत राहण्याची परवानगी असते त्यानंतर त्या मुलांनी कोठे जायचे याचा विचारच कोणी करत नाही. आम्ही त्यावर गेल्या ६ वर्षापासून काम सुरु केले असून आजपर्यंत आम्ही १ हजार २६१ मुले दत्तक घेतली आहेत. त्यातील ५ मुले पोलीस उपनिरीक्षक, ७२ मुले कॉनस्टेबल, २ विक्रीकर निरीक्षक झाली असून १ लेक लंडन येथे नोकरीनिमित्त गेली आहे.
अनाथालयात वाढलेल्या मुलींची लग्न होतात पण त्यांना माहेरच नसते यासाठी आम्ही आता पुण्याच्या जवळ “माहेरवाशीण सदन” उभे करत आहोत. चार दिवस या मुलीनी तेथे माहेरपण उपभोगण्यासाठी यावे अशी यामध्ये संकल्पना आहे. यावेळी श्रीकांत भारतीय यांनी लहान लहान उदाहरणे देवून माणसातील संवेदनशीलता कशी जपता येते हे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा सुशासन समितीचे जिल्हा संयोजक व भाजप जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक यांनी केले तर माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी आ. श्रीकांत भारतीय यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दापोलीकर उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.