loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ समाजनेते श्री. अब्दुल बिजली खान यांना भाजपचे नियुक्तीपत्र

रत्नागिरी :भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सुप्रसिध्द समाजसेवक श्री. अब्दुल बिजली खान यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकतेच भाजपाचे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. राजेश सावंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. भाजपच्या विविध मोर्चांच्या नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम रत्नागिरीतील भाजपा कार्यालयात नुकताच पार पडला. त्यावेळी भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने अल्पसंख्यांक समाजासाठी केलेल्या विकास कामांची माहिती समाजा पर्यंत पोहोचवण्यात यावी अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी व्यक्त केली. त्यावर बोलताना अल्पसंख्यांक मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. अब्दुल बिजली खान यांनी सांगितले की, अल्पसंख्यांक समाजाला भाजप पक्षाकडे वळविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वेळी मोहल्ल्यांमध्ये जाऊन जनसंपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांच्यासह शहर अध्यक्ष श्री. दादा ढेकणे, युवा मोर्चाध्यक्ष श्री. मंदार खंडकर, शहर चिटणीस श्री. संदीप सुर्वे, प्रदेश नेते श्री. विक्रम जैन, सरचिटणीस श्री. निलेश आखाडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. विकास धाडस व श्री. फहीम फणसोपकर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg