सिंधुदुर्गनगरी :- उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील जनहीत याचिका क्र. 198/2014 सह 179/2012 मध्ये दि.5 डिसेंबर 2018 व दि 22 मार्च 2024 च्या आदेशाचे संपूर्ण दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील एकूण 13 गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घातलेली आहे. अशी माहिती सावंतवाडी दोडामार्ग टॉस्क फोर्स समितीचे सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे. पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडील दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या भारत सरकार यांच्याकडील प्रस्तावीत अधिसूचनेमध्ये दोन्ही तालुक्यातील एकूण 25 गावांचा इको सेन्सिटीव्ह एरीयामध्ये समावेश आहे. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडोल जनहीत याचिका क्र. 198/2014 मध्ये दि. 5 डिसेंबर 2018 व दि.22 मार्च 2024 चे आदेशान्वये अवैधरीत्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवणेकामी व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सावंतवाडी दोडामार्ग टास्क फोर्स समीती तयार करण्यात आलेली आहे.
या समितीमध्ये महसूल विभाग, वन विभाग व पोलिस विभाग मधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सावंतवाडी-दोडामार्ग Task Force समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी असून सदस्य सचिव सहाय्यक वनसंरक्षक हे आहेत. त्याचबरोबर यासमितीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार सावंतवाड़ी, दोडामार्ग, वनपरिक्षेत्र अधिकारी सावंतवाडी, आंबोली, दोडामार्ग व पोलिस निरीक्षक सावंतवाडी, दोडामार्ग हे सदस्य आहेत. या समितीच्या मासिक बैठकीमध्ये उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार वृक्षतोडीस प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये संबंधित विभागांनी वृक्षतोडीस प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पर्यावरणीय ऱ्हास रोखण्यासाठी केलेली कार्यवाही, प्रचार-प्रसिध्दी व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जातो. सावंतवाडी-दोडामार्ग Task Force समितीने ठरविल्याप्रमाणे तमाम जनतेस सुचित करणेत येते को, दोडामार्ग तालुक्यात कोठेही गावात खाजगी मालकी शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होताना निदर्शनास आल्यास घटनेबाबत जनतेने गावातील पोलिस पाटील, वनरक्षक, तलाठी यापैकी कोणालाही तातडीने कळविण्यात यावे, जेणेकरून वनविभागाकडील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी जावून तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करतील, तसेच अशा चौकशी प्रकरणामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर नागरीकांनी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे अशी विनंती करण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड प्रकरणी महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनीयमन) अधिनियम 1964 व महाराष्ट्र जमीन महसूल (झाडे इत्यादींच्या बाबतीतील अधिकारांचे नियमन करण्याबाबत) नियम 1967 अन्वये कडक कारवाई करण्यात येईल.
वृक्षतोड बाबत ऑनलाईन तक्रारीसाठी सावंतवाडी-दोडामार्ग Task Force समीतीचा ईमेल आयडी तयार करण्यात आलेला आहे, ईमेल आयडी sdtfsawantwadi@ gmail.com असा आहे, या ईमेल वर आपण वृक्षतोडीच्या घटनाबाबत तक्रार दाखल करू शकता. तसेच वृक्षतोड वाचत तक्रारीसाठी आपण वनविभाग सावंतवाडी ०२३६३-२७२००५ यांच्याकडे दूरध्वनीव्दारेही तक्रार दाखल करू शकता. सावंतवाडी- दोडामार्ग टास्क फोर्स समीतीचे कार्यक्षेत्रामध्ये समावेश असलेली गावांची यादी सावंतवाडी तालुक्यातील गावे पुढीप्रमाणे:- असनिये, पडवे माजगाव, भालावळ, तांबोळी, सरमळे (नेवली सह), दाभिळ, ओटावणे, कोनास, घारपी, उडेली, केसरी, फणसवडे. दोडामार्ग तालुक्यातील गावे पुढीलप्रमाणे:- कुंभ्रल, पंतुर्ली, तळकट, झोळंबे, कोलझार, शिरवळ, उघाडे, काळणे, भिकेकोनाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली, फुकेरी.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.