loader
Breaking News
Breaking News
Foto

कोल्हापूर सर्किट बेंचसाठी विधी सेवा समितीवर ॲड. उमेश सावंत

कणकवली (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायलयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मोफत विधी सेवा समितीच्या पॅनलवर सिंधुदुर्ग जिल्हयातून ॲड .उमेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समितीच्यामार्फत ही नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्मीत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसाठी विधी, सेवा समितीमार्फत गरजूंना मोफत विधी सेवा पुरविण्यासाठी नुकतीच विधज्ञांची यादी जाहिर करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामध्ये सिंधुदुर्गमधून ॲड .उमेश सावंत यांची दिवाणी, फौजदारी व महसुली कामांसाठी पॅनलवर निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोरील खटल्यांसाठी विधी सेवा समिती त्यांची नियुक्ती करू शकणार आहे. तसेच कोल्हापूर सर्किट बेंचसाठी तज्ज्ञ मध्यस्थ म्हणून निवृत्त न्यायाधिशांसोबत देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg