जम्मू :- रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून त्यांच्या भक्तगणांनी जम्मू येथील पूरग्रस्तांना १२५ ताडपत्री व ३०० ब्लँकेटचे वाटप केले. ऑगस्ट अखेर जम्मू आणि आसपासच्या भागांत झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक घरांत पाणी साचून भिंतींना तडे गेले. पुरात घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापार्श्वभूमीवर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून गरजू नागरिकांना ताडपत्री आणि ब्लँकेटचे मोफत वाटप करण्यात आले. मानव सेवा हीच ईश्वर सेवा या सेवाभावनेतूनच रामानंदाचार्य संप्रदायतर्फे जम्मू येथे आपत्कालीन मदत साहित्याचे म्हणजे १२५ ताडपत्री आणि ३०० ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. २ ते ५ ऑक्टोबर २०२५ या काळात जम्मू येथे विविध ठिकाणी साहित्याचे वाटप करण्यात आले.
त्यामध्ये गुज्जर बस्ती, जम्मू युनिव्हर्सिटी जवळ, जम्मू सिटी, मढ् - ( ता. नगरोटा, ) कैरी- (ता. भलवाल, ) पढुण ऐथम, (ता. जम्मू ) या गावांचा समावेश होता. हे आपत्कालीन मदत साहित्य वाटप करण्यासाठी रामानंद संप्रदायाचे गुरुसेवक सर्वश्री दिलीप जाधव, अनिल तारकर, शंकर कारकर, मिलिंद मोगरे, दीपक मोरे, संतोष आंबोळकर, सत्यवान दानवले यांच्या सह अनेक गुरुसेवक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात जम्मू येथील माजी मुख्याध्यापक जगदीश राज, कैरीचे सरपंच निशेतर सिंह, मढचे माजी सरपंच सतपाल नसीब सिंह, राजेशकुमार डोगरा, बलराम, अंजु डोगरा, रेणूदेवी, अंजु देवी, रजनी देवी, बजालता मंडळ प्रधान शिव कुमार, अजय कुमार शर्मा, विष्णु सिंह, सुवर्णसिंग, ब्रिजलाल शर्मा आदी उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.