म्हसळा, रायगड - म्हसळा पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी हरवलेले मोबाईल फोन शोधून काढण्यामध्ये स्थानिक पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.सीइआयआर पोर्टलवर ट्रेसिंगसाठी नोंदवलेले मोबाईल ट्रेस करून सुमारे १.२० लक्ष रुपये किमतीचे ६ स्मार्टफोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. हे मोबाईल फोन संबंधित तक्रारदारांना उप विभागीय प्र.पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांच्या हस्ते थेट त्यांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याचे म्हसळा तालुका पोलिस निरीक्षक संदिप कहाले यांनी माहिती देताना सांगितले.
मोबाईल प्राप्त करणाऱ्या तक्रारदारांमध्ये प्रामुख्याने संतोष शशिकांत पानसरे, स्वप्नील रविंद्र लाड, योगेश मोहन भागवत,सुदेश अशोक देवडे,जमीर तुरूक आणि अजिज नजीर यांचा समावेश आहे.सदर कामगिरी रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या मोहिमेत प्रामुख्याने पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, उप पोलीस निरीक्षक रोहिणकर, पोलीस कॉन्स्टेबल गजानन कांबळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल बोगाणे, आणि पो.कॉ.पगार यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. हरवलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले असून म्हसळा पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे.
मोबाईल हरवले असताना सीइआयआर पोर्टलचा वापर करून दाखल केलेली माहिती पोलिसांच्या तपासाची दिशा निश्चित करण्यात उपयुक्त ही विशेष बाब ठरली आहे. आपला मोबाईल हरवल्यास CEIR पोर्टलवर त्वरित नोंद करा म्हसळा पोलीस प्रशासनाचा नागरिकांना सल्ला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.