loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी आम्हाला रोजगाराची साधन उपलब्ध करून द्यायची आहेत - खा. तटकरे

म्हसळा - रायगड : श्रीवर्धन मतदार संघात सर्वांगीण विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असताना म्हसळा येथे हिंदु समाजातील विविध घटकांना सामाजिक सभागृह आणि शहरातील पर्यटन,देवस्थान आणि सार्वजनिक विकासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथे उभारण्यात आलेले सामाजिक,सांस्कृतिक भवन हे केवळ समाज संवाद बैठकांसाठी न वापरता ते रोजगाराभीमुख उपयोगात आणले पाहिजेत असे स्पष्ट मत खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा शहर होळीचे सहाण श्री साई मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजना वेळी स्वागत कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सांगितले.श्रीवर्धन हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ सुरू झाले आहे. येथे दक्षिण काशी हरिहरेश्वर,सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगर आणि समुद्र चौपाटी उपलब्ध असल्याने पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र बनले आहे.पर्यटनाबरोबरच येथील झालेले स्थलांतर रोखण्यासाठी आम्हाला उद्योग व्यवसायाला चालना देण्याचे काम करायचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्या साठी आवश्यक रोजगाराची साधन निर्माण करायचे असल्याचे मत खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.कुंभार समाज श्री संत गोरोबा काका नवरात्रोत्सव मंडळ म्हसळा येथे हिंदु ग्रामस्थ मंडळाने आयोजित स्वागत कार्यकमाला खासदार सुनिल तटकरे यांच्या समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर,नगराध्यक्षा फरहीन बशारत,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, माजी नगराध्यक्ष संजय कर्णिक,समाज अध्यक्ष नदकुमार गोविलकर, सचिव सुशिल यादव, नवरात्र मंडळ अध्यक्ष सुनिल आंजर्लेकर, संतोष कुडेकर, माजी नगराध्यक्षा कविता बोरकर, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, सोनल घोले,नगरसेविका सरोज म्हशिलकर,वृषाली घोसालकर, भाई बोरकर, नाना सावंत, किरण पालांडे, महेश घोले, आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

विकासापासून वंचित राहिलेल्या म्हसळा सारख्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माध्यमातून विशेषता खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांनी नव्याने ४३ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना, हिंगुलकरणी देवता स्थळ पर्यटन विकास,नगर पंचायत प्रशासकीय इमारत,छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणीचे कामांना मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून यातील काही कामे प्रगतीपथात असल्याचे सचिव सुशिल यादव यांनी प्रास्ताविक करताना विशेषता ग्राम दैवत श्री धावीरदेव महाराज यांना पोलिस बँड पथकाने शासकीय मानवंदना देण्याची प्रथा चालु ठेवली आहे त्या कामाची आठवण इतिहासात नोंद राहील असे सांगितले.म्हसळा हिंदु ग्रामस्थ मंडळ आणि संत गोरोबा काका नवरात्रोत्सव मंडळांचे वतीने खासदार सुनिल तटकरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले.कार्यक्रमांचे स्वागत व सूत्रसंचलन संतोष कुडेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg