loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत रोटरी स्कूल अव्वल

खेड - ( प्रतिनिधी )- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी द्वारा आयोजित रत्नागिरी जिल्हा योगासन संघटना यांच्या तांत्रिक सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा 2025-26 संपन्न झाल्या. यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 14 सुवर्ण पदके, 1 रौप्य पदक व 1 कांस्य पदकाची कमाई केली. सदरच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांतील योगापटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धकांशी चुरशीची लढत देत अनेक पदके पटकावून जिल्हास्तरावर रोटरी स्कूलचे नाव गौरविले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्येे 14 वर्षे मुले या वयोगटात ट्रॅडिशनल वैयक्तिक या प्रकारामध्ये शाश्वत धुमाळ - सुवर्ण पदक, श्री दळवी - रौप्य पदक, श्लोक दळवी - कांस्य पदक, आर्टिस्टिक वैयक्तिक या प्रकारामध्ये स्पंदन धामणे - सुवर्ण पदक, आर्टिस्टिक सांघिक या प्रकारामध्ये स्पंदन धामणे - सुवर्ण पदक, शाश्वत धुमाळ - सुवर्ण पदक, कलात्मक सांघिक या प्रकारामध्ये श्री दळवी - सुवर्ण पदक, श्लोक दळवी - सुवर्ण पदक, 14 वर्ष मुली या वयोगटात आर्टिस्टिक सांघिक या प्रकारामध्ये श्रावणी दिवेकर - सुवर्ण पदक, इशदा भोसले - सुवर्ण पदक, कलात्मक सांघिक या प्रकारामध्ये श्रावणी दिवेकर - सुवर्ण पदक, इशदा भोसले - सुवर्ण पदक, 19 वर्षे मुली या वयोगटात आर्टिस्टिक सांघिक या प्रकारामध्ये अनुष्का म्हातले - सुवर्ण पदक, प्रांजल आंबेडे - सुवर्ण पदक, कलात्मक सांघिक या प्रकारामध्ये अनुष्का म्हातले - सुवर्ण पदक, प्रांजल अंबाडे - सुवर्ण पदक पटकावून यश संपादित केले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

सर्व सुवर्णपदक विजेत्यांची दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी इचलकरंजी येथे होणार्‍या विभागीय योगासना स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व योगापटूंना योगा प्रशिक्षक डॉ. गौरव आंब्रे व शीतल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीन पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

14 सुवर्ण, 1 रौप्य व 1 कांस्य पदक

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg