वेळणेश्वर (उमेश शिंदे) - महाराष्ट्रात सरकारच्या जुलमी निर्णयाविरोधात जनतेचा उद्रेक उसळला. मंगळवारी खेर्डी येथे काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाने महावितरण कार्यालय घोषणांनी दणाणून गेलं. मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेते व आमदार भास्करराव जाधव यांनी केलं, तर पुढाकार चिपळूण युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी घेतला. या जनआक्रोशात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष एकत्र आले आणि नागरिकांच्या मनातील संतापाला वाट मोकळी झाली. महावितरणकडून विजेची जुनी मीटर काढून बळजबरीने प्रीपेड मीटर बसवली जात आहेत. त्यामुळे वीजबिलं दुप्पट-तिप्पट येऊ लागल्याने जनतेत संतापाची लाट पसरली आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तलुकाप्रमुख बळीराम गुजर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शहा, माजी जि.प अध्यक्ष विक्रांत जाधव, शिवसेना शहराध्यक्ष सचिन उर्फ भैय्या कदम, उपतालुका प्रमुख सचिन शेट्ये, काँग्रेसचे उपतालुका अध्यक्ष सुबोध सावंतदेसाई, संजय जाधव, राष्ट्रवादी पवार गटाचे उपतालुका अध्यक्ष सुनील गुरव, शिवसेनेचे विभाग प्रमुख विजय शिर्के, राम डिगे, सुरेंद्र शिंदे, सचिव संभाजी खेडेकर, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे, उपविभाग प्रमुख मंगेश कोकीरकर, समीर सावंत विभाग संघटक रोशन आंब्रे, शाखाप्रमुख सुनील नरळकर, भाऊ मोरे, युवासेना शहरप्रमुख पार्थ जागुष्टे, युवासेना विभाग अधिकारी राहुल भोसले, युवासेना सचिव प्रतीक शिंदे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष निर्मलाताई जाधव, शिवसेनेच्या उपविभाग अधिकारी पल्लवी चव्हाण, युवा युवतीसेना तालुका अधिकारी शिवानी खताते, ओबीसी जिल्हा सेलचे महादेव चव्हाण, युवासेना शाखाप्रमुख निलेश शिगवण, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख ओंकार पंडित, शिवसेनेचे इकबाल बेबल, मुसा चौगुले, मुराद चौगुले, संजय चांदे, सुधाकर दाते, यशवंत लाड, कमाल बंदरकर, दीपक मोरे, विनय पितले, युसूफ बेबल, शिवसैनिक बावा सुर्वे, मनोज चव्हाण, माजी सरपंच प्रवीण पाकळे, संतोष चोपडे,, ग्रामपंचायत माजी सदस्या कुंभार मॅडम आदींसह खेर्डी व पेढे जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते.
महावितरण कार्यालयासमोर मोर्चा येताच घोषणाबाजीचा कडकडाट झाला. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले आणि प्रीपेड मीटरचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. यापुढे एकही प्रीपेड मीटर बसवता कामा नये, आधी बसवलेली मीटर तात्काळ काढण्यात यावीत. जबरदस्ती केल्यास महाविकास आघाडी योग्य तो बंदोबस्त करेल असा इशारा देण्यात आला. स्मार्ट मीटरचा फसवा खेळ बंद झाला पाहिजे. गलथान कारभार, भ्रष्ट व्यवहार थांबला पाहिजे. वीज दरवाढ, चुकीची बिले यासंदर्भात महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.