loader
Breaking News
Breaking News
Foto

गोव्यातील लोकसाहित्याच्या अभ्यासक पौर्णिमा केरकर यांचे ११ रोजी व्याख्यान

सावंतवाडी - श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन यांच्यावतीने कै. विजयश्री जयानंद मठकर यांया जयंतीनिमित्त शनिवार ११ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता गोव्यातील लोकसाहित्याच्या अभ्यासक पौर्णिमा केरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात हे व्याख्यान होणार आहे. कोकण व गोमंतकाच्या लोकसाहित्यातील स्त्री जीवन’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक उषा परब भूषविणार आहेत. विजयश्री मठकर यांच्या जयंतीप्रित्यर्थ दरवर्षी महिला व मुलांसंदर्भात प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये स्त्रिया व बालकांचे आरोग्य, कायदे, विविध समस्या, कौटुंबिक जीवन अशा विविध विषयांवर आजवर अनेक तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले आहे. पौर्णिमा केरकर यांया व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.प्रवीण बांदेकर यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg