loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर नगरपंचायतचे प्रभाग आरक्षण जाहीर

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुक २०२५ च्या आरक्षण सोडत कार्यक्रम नुकताच गुहागर भंडारी भवन येथे पार पडला. या प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रमाचे पीठासन अधिकारी म्हणून दापोलीचे प्रांत डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी काम पाहिले. यावेळी गुहागर नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण व अन्य कर्मचारी उपस्थित होते. या आरक्षण सोडतमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वसाधारण, प्रभाग ३ सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ५ सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग १० नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ११ सर्वसाधारण, प्रभाग १२ सर्वसाधारण महिला, प्रभाग १३ सर्वसाधारण, प्रभाग १४ सर्वसाधारण, प्रभाग १५ सर्वसाधारण, प्रभाग १६ सर्वसाधारण, प्रभाग १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण पडले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनेक प्रभात मध्ये महिला आरक्षण पडल्याने विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगले असल्याची चर्चा सुरू होती, तर अनेक प्रभागमध्ये स्त्री राखीव पडल्याने इच्छुक पदाधिकारी आपल्या पत्नीच्या माध्यमातून नगरसेवक पद घरी कसे येईल याचे स्वप्न पाहत आहेत. काही ठिकाणी तर नगरसेवक पदासाठी महिलांमध्ये चुरस निर्माण होईल अशी ही स्थिती निर्माण झाली आहे. या प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रमसाठी गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg