loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या प्रसिद्ध जागृत मोटर्स प्रा. लि. येथे मारुती सुजूकी विक्टोरिसचे नवीन मॉडेल लॉंच

रत्नागिरी - रत्नागिरीच्या प्रसिद्ध जागृत मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड येथे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या शुभहस्ते मारूती सुजूकी विक्टोरिसचे नवीन मॉडेल लॉंच करण्यात आले. यावेळी सचिन काळे चित्रपट कलाकार यांच्यासह बंड्याशेेठ साळवी, बाबू म्हाप, राजन शेटये आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पहिल्या गाडीच्या अनावरणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून सहा ग्राहकांनी अगोदरच नोंदणी केली आहे. त्यामुळे या नवीन मॉडेल ला ग्राहकांची मोठी पसंती लाभणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांच्या विश्वासाला पात्र जागृत मोटर्स रत्नागिरी ठरली आहे. नवीन मॉडेेलमध्ये वृद्ध आणि बालकांसाठी खूप फिचर्स असून सुरक्षित प्रवासासाठी ही कार यशस्वी म्हटली जात आहे. या कारचे अनवरण पालकमंत्री ना. सामंत यांनी केल्यानंतर मंत्री महोदयांनी स्वतः कार चालवून याचा अनुभव घेतला. या मारूती विक्टोरिस कारची किंमत १०.५० लाख ते टॉप मॉडेल १९.९९ लाख रुपयांपर्यत उपलब्ध आहे. जागृत होंडा मोटर्सचे आदित्य जोशी, प्राची जोशी, जनरल मॅनेजर अतुल जाधव यांनी सर्व ग्राहकांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्या प्रसंगी उदय सामंत, नरेंद्र देव्हारे ( AGM - BOI Zonal Office , Ratnagiri ), सचिन काळे - मराठी अभिनेते , डायरेक्टर - राजेंद्र केशव जोशी, डायरेक्टर - सौ. रेश्मा राजेंद्र जोशी , डायरेक्टर - आदित्य राजेंद्र जोशी , सौ. प्राची आदित्य जोशी , श्रीमती लीला केशव जोशी आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg