loader
Breaking News
Breaking News
Foto

कुडुक खुर्द धरण प्रकरण लवकरच मार्गी लागणार, मंत्रालय येथे राज्यमंत्री योगेश दादा कदम यांची भेट.

खेड (प्रतिनिधी) - राज्यमंत्री महोदय योगेशदादा रामदास भाई कदम यांची प्रकाश यादव व शिवसेना शिरगाव गण उप विभाग प्रमुख मुंबई विभाग सचिन शेलार यांच्या प्रयत्नांनी गुजरकोंड ग्रामस्थांनी भेट घेतली. गूजरकोंड गावातील ग्रामस्थांनी कुडुक खुर्द धरण प्रकल्पासंदर्भात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या व काम रखडलेले आहे तरी ते चालू व्हावे आणि काही अडचण असेल तर ती आपल्या मार्फत सोडवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व जमिनीचा मोबदला मिळावा असे निवेदन कुडुक खुर्द गूजरकोंड मधील ग्रामस्थांनी राज्यमंत्री योगेशदादा कदम यांची मंत्रालय येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. या भेटीत त्यांनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या आणि नुकसानीची सविस्तर माहिती मंत्री महोदयांना दिली. लवकर सर्व मागण्या पूर्ण करू असे आश्वासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी मुंबई ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रशांत साळुंके तसेच ग्रामस्थ दिलीप पवार, विष्णू यादव, सुधाकर शेलार, दिनेश शेलार, नितीन गोरड ग्रामस्थ उपस्थित होते .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg