loader
Breaking News
Breaking News
Foto

शालेय जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी- रत्नागिरी क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व स्केटिंग असोसिएशन रत्नागिरी तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा दिनांक ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी नवनिर्माण हायस्कूल रत्नागिरी येथे घेण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोली, राजापूर या तालुक्यातील एकूण शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेचे उद्घाटन तालुका जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सदर स्पर्धा जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा संघटनेचे सचिव अरुण बेग यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेसाठी तांत्रिक समिती मध्ये खेड तालुक्याचे सचिव विजय निगडेकर, चिपळूण तालुक्याच्या सचिव योगिता पाटणे, पंच विश्व पाटणे, दापोली प्रशिक्षक प्रथमेश दाभोळे, चिपळूण तालुक्याचे विशाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदरची स्पर्धा कॉड व इनलाईन या दोन प्रकारांमध्ये ११ ते १९ वर्षाआतील वयोगटामध्ये घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेमध्ये विजयी झालेले खेळाडू खालील प्रमाणे कॉड-११ वर्षाआतील मुले- १) विघ्नेश विनायक कुर्‍हाडे- प्रथम- रत्नागिरी, २) वरद शिवानंद टॉम्पे- द्वितीय- खेड ३) स्वतेज प्रसाद लाड-तृतीय-रत्नागिरी कॉड-११ वर्षाआतील मुली- १)अदिती अंकुश लाल-प्रथम- खेड, २)अक्षरी पांडुरंग डोके- द्वितीय- खेड कॉड-१४ वर्षाआतील मुले- १) आदित्य निलेश भुते- प्रथम- रत्नागिरी, २)मिहीर महेंद्र जाधव- द्वितीय- रत्नागिरी ३)हर्ष संदेश आंब्रे- तृतीय- खेड कॉड-१४ वर्षाआतील मुली- १) मृणाल नितीन भोसले- प्रथम- खेड, २) सान्वी संदीप दरेकर- द्वितीय- खेड ३)अनन्या स्वप्नील मुरकर- तृतीय- रत्नागिरी कॉड-१७ वर्षाआतील मुले- १)वेदांत निलेश सनगरे- प्रथम- रत्नागिरी, २)वेदांत प्रशांत कुबल- द्वितीय-रत्नागिरी कॉड-१९ वर्षाआतील मुले- १) अन्वित समीर जाधव- प्रथम- दापोली, २)निशांत अजित जाधव- द्वितीय- खेड इनलाईन-११ वर्षाआतील मुले- १)प्रद्युम्न प्रथमेश दाभोळे-प्रथम- दापोली, २)मुसा शमशाद खान-द्वितीय- दापोली ३)जाकीर समीर पटेल- तृतीय- चिपळूण इनलाईन-१४ वर्षाआतील मुले- १)भावेश आशिष झोरे-प्रथम-रत्नागिरी, २)श्लोक अभिजित पाटील-द्वितीय-रत्नागिरी ३)कार्तिक प्रकाश राठोड- तृतीय- रत्नागिरी इनलाईन- १४ वर्षाआतील मुली- १) ऐश्वर्या पराग सावंत- प्रथम-रत्नागिरी, २)दिशा दिनेश चौधरी-द्वितीय-खेड ३)सारा शाहिद कापडी-तृतीय-रत्नागिरी इनलाईन-१७वर्षाआतील मुले- १) ध्रुव धनंजय बसणकर- प्रथम-रत्नागिरी, २) समर्थ संतोष पवार-द्वितीय-रत्नागिरी ३) स्वराज सचिन पवार-तृतीय-खेड इनलाईन १९ वर्षाआतील मुली- १) रिझा नवाफ सुवर्णदुर्गकर- प्रथम-रत्नागिरी

टाईम्स स्पेशल

या सर्व विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणार्‍या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विद्यार्थी विभागीय स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल जिल्हा संघटना स्केटिंग असोसिएशन रत्नागिरी तालुका, जिल्हा रत्नागिरीमार्फत त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg