loader
Breaking News
Breaking News
Foto

07 ऑक्टोबर रोजी जानवळे येथे वर्षावास प्रवचन मालिका सांगता समारंभाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) - बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या व अंतर्गत धार्मिक संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील जानवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह जानवळे येथे मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता वर्षावासातील प्रवचन मालिका सांगता समारोप आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील बौद्ध बंधू - भगिनी, उपासक, उपासिका तसेच तालुक्यातील, विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने वेळेत उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे अध्यक्ष सुरेश(दादा) सावंत, कार्याध्यक्ष एम.डी. मोहिते, सचिव सुनील गमरे, अंतर्गत धार्मिक संस्कार समिती अध्यक्ष शशिकांत जाधव, सचिव सुनील जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवार दिनांक 07 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता धम्म पूजा पाठ होईल त्यानंतर सकाळी 10:30 वाजता बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे अंतर्गत हिशोब तपासणीस अविनाश शिवराम कदम यांचे बुद्ध धम्म या विषयावर धम्म प्रवचन होणार आहे. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता मान्यवरांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर 12:00 वाजता मान्यवरांचे मनोगत व चर्चासत्राच्या आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर दुपारी 02:00 वाजता उपस्थित सर्वांना भोजनदान ठेवण्यात आलेल्या आहे. तरी गुहागर तालुक्यातील बौद्ध बंधू भगिनी उपासक उपासिका तसेच धम्म संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या संपूर्ण कार्यक्रमाला वेळेत, बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg