loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण आयटीआयमध्ये अल्पमुदत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ; आज शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी) - शासन निर्णयानुसार मालवण येथील ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही (आयटीआय) अल्पमुदत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उदघाटन दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालय केंद्रामध्ये पायाभूत सुविधांचा महत्तम उपयोग करून संस्थेच्या वेळेव्यतिरिक्त वेळात अल्पमुदत अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. या उपक्रमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळावी, रोजगार क्षमतेत वाढ व्हावी व कौशल्य विकासाला चालना मिळावी हा या मागे शासनाचा उद्देश आहे.

टाइम्स स्पेशल

या अंतर्गत मालवण येथील ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही अल्प मुदत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्थेत ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, हॅन्ड एम्ब्रॉयडर, आर्क व मेटल आर्क वेल्डिंग, ए. सी. टेक्निशियन, फिटर आदी अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. या अभ्यासक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच उदघाटन समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण तर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg