मुंबईः विजयादशमीच्या निमित्ताने दरवर्षी आपापल्या रेल्वेच्या डब्यात विजयदशमी हा सण जोरदार पद्धतीने साजरा केला जातो. यंदाही साई भजन मंडळ (डोबिवली - दिवा) यांनी जल्लोषात साजरा केला. यावेळी वारकरी परंपरा जपत या मंडळाचे अध्यक्ष अंकुश बोरगे बुआ यांनी एक देश, एक गणवेष असे दाखवून दिले. उपाध्यक्ष प्रवीण मेढेकर बुआ यांनी आपल्या मध्य, पश्चिम, हार्बर या तिन्ही मार्गाचे सर्व भजन मंडळ कमिटीचे अध्यक्ष हनुमंत तावडे महाराज यांचा शाल व श्रीफळ देऊन मानाने सत्कार केला, यांचवेळी पत्रकार दिनेश हुमणे यांचा सत्कार अध्यक्ष अंकुश बोरगे यांच्या हस्ते करण्यात आला. यांचबरोबर डोंबिवली स्थानकचे रेल्वे मास्तर, रेल्वे पोलीस अधिकारी, आणि मोटरमन यांचाही सत्कार करण्यात आला.
भजन मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण मेढेकर यांनी भजनाच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करून भजन परिसर दुमदुमून टाकले. प्रत्येकाचे पाय या गाडीकडे आकर्षण करीत होते. गाडी पूर्णपणे हार, फुगे, पताके, लावून पारंपारिक पद्धतीने सजविली जाते. नारळ वाढवून गाडीची आणि देवीची पूजा, आरती केली जाते. यंदा पूजेचा मान उमेश घरवे आणि दिपक कांबळे यांना मिळाला. हा रोजचा येण्याजाण्याचा प्रवास सुखकर व्हावा याचे गार्हाणं घालण्यात सर्व भजन आणि प्रवासी हातभार लावत असतात, यावेळी सुधीर सावंत, विकास हळदवणेकर, राकेश गायकवाड, विजय वर्दम, अशोक शिंदे, सचिन बेलकर, विनय विचारे, प्रदीप कदम, प्रशांत नारकर, सुदर्शन सांगले, नितीन देवकर, दिंगबर बच्छाव, श्रीकांत रामाने, संतोष निकम, सुभाष केंजळे, कृष्णा साळवी, सुरेश मोरे, मंगेश खळे, प्रशांत थोरवे, नंदकिशोर आग्रे आणि या भजन मंडळात महिलांचा समावेश होता.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.