loader
Breaking News
Breaking News
Foto

अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या विक्रेत्यांचे 'ट्रेड प्रमाणपत्र' रद्द करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे : (प्रतिनिधी) राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना (मल्टी ब्रँड आउटलेट) विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ' ट्रेड प्रमाणपत्र ' रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले. ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्या सह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

'मल्टी ब्रँड आउटलेट '(MBO) सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झालेली आहे. राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनाधिकृत वाहन विक्री करीत असतात. राज्यात इतर विभागातून तसेच परराज्यातून नवीन वाहने आणून ' ट्रेड प्रमाणपत्र ' नसताना अनाधिकृतरित्या वाहन विक्री करतात. भविष्यात अशा अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या अधिकृत वाहने विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले.

टाईम्स स्पेशल

या बैठकीमध्ये ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या विविध मागण्यांच्या वर चर्चा झाली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहिले!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg