केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता २ ते ८च्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन १ चे आयोजन दि.१० ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शासनातर्फे करण्यात आले असले तरी परीक्षे पूर्वीच पेपर्स चव्हाट्यावर आला आहे .गोपनीयतेचा भंग झाला असुन शासनाने राज्यस्तरावर छपाई करुन मोफत पेपर्स पुरविण्याची स्कीम हवेत विरली असल्याचे बोलले जात आहे.
संकलित चाचणी करीता मराठी,गणित व इंग्रजी या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार होत्या.राज्यभर हा तुटवडा असल्याचे समजते. लांजा तालुक्यातही अनेक शाळांना विद्यार्थी पटाप्रमाणे प्रश्नपत्रिका वितरीत झालेल्या नाहीत.हे उघड झाले.शाळांना झेरॉक्स काढण्याच्या तोंडी सूचना दिल्या गेल्या. त्यामुळे प्रश्नपत्रिका झेरॉक्स सेंटरवर, बाजारात, व्हॉट्स ॲप वर व्हायरल झाल्याने शिक्षण विभागाची नापासी चव्हाट्यावर आली असल्याचे बोलले जात आहे. प्रश्नपत्रिका राज्यस्तरावर तयार होवूनही शासन परिपत्रकाचे निर्देश गुंडाळून प्रशासनाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे पॅट परीक्षेचे पेपर्स शाळांना कमी मिळाले गेले. त्यामुळे झेरॉक्स प्रती बाजारात आल्या नी परीक्षा होण्यापूर्वीच शिक्षण विभागाचे तीनतेरा वाजले आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करावयाच्या होत्या.तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त चाचणी पत्रिका ठेवाव्यात. तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळास्तरावर प्रश्नपत्रिका पोहचवाव्यात, असे शासन परिपत्रकात नमूद असताना केंद्रीयप्रमुखांनी सोयीच्या ठिकाणी मुख्याध्यापकांना बोलावून प्रश्नपत्रिकांचे वाटप केले.त्यात अनेक प्रश्नपत्रिकांचा तुटवडा होता. त्यामुळे कमी मिळालेल्या प्रश्नपत्रिका झेरॉक्स काढाव्यात आणि परीक्षा घ्यावी असे तोंडी निर्देश प्रशासनाने दिले. त्यामुळे प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्या.
तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या होत्या. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणीपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावयाची होती.पण तसे काही न होता चक्क शाळांना झेरॉक्स काढण्याच्या तोंडी सूचना दिल्या गेल्या. दरम्यान एक एक प्रश्नपत्रिका आठ-आठ पृष्ठांची असल्याने शाळांना कोणतीही आर्थिक तरतूद नसताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागलाच. त्यासह गोपनीयता भंग झाली . प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्या. पॅट परीक्षेचा वेगळा 'अर्थ' समोर आला आहे. त्यामुळे शासनाने राज्यस्तरावर छपाई करुन मोफत शाळांपर्यंत पेपर्स पोचविण्याची 'स्कीम' हवेतच विरली . त्यात मोठा भ्रष्टाचार घडत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पटसंख्या निश्चित असताना दरवेळी कमतरता समोर येते.याचा अर्थ जाणीवपूर्वक कमी प्रती छापल्या जात असाव्यात ? असे शिक्षण वर्तुळात चर्चिले जात असून शिक्षण विभागाच्या अंदाधुंदी गलथान कारभार प्रश्नपत्रिकेप्रमाणे 'व्हायरल' होत आहे. या अजब कामाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.