loader
Breaking News
Breaking News
Foto

स्व. नेहा कोळंबकर स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात ६५ जणांचे रक्तदान

मालवण (प्रतिनिधी) - राष्ट्रीय ऐच्छीक रक्तदान दिनाचे औचित्य साधून एकता मित्रमंडळ, मालवण आणि ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६५ जणांनी रक्तदान करून दिवंगत ग्लोबल रक्त विरांगना सौ. नेहा शंकरदास कोळंबकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आणि रुग्णोपयोगी वैद्यकीय साहित्य योजनेचा शुभारंभ डॉ. सुभाष दिघे यांच्याहस्ते तसेच तहसीलदार श्रीमती वर्षा झाल्टे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ संकेत लांडगे, माजी नगरसेवक दिपक पाटकर, शर्वरी पाटकर, महेश (बाळू) अंधारी, राजा शंकरदास, उत्तम पेडणेकर, मातृत्व आधारचे दादा वेंगुर्लेकर, रोटरी क्लबचे उमेश सांगोडकर, लायन्स क्लबच्या अनुष्का चव्हाण, सौ. सुविधा तिनईकर, जयश्री हडकर, फॅनी फर्नांडिस, नंदिनी गावकर, अंजली आचरेकर, वैशाली शंकरदास, ऍड ऋषी देसाई, डॉ जुई देसाई, सुधीर धुरी, राजेश पारधी, मुकेश बावकर, शांती पटेल, अरविंद ओटवणेकर, राजू बिड्ये, विजय पांचाळ, अमेय देसाई आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबिर स्थळी ग्रामीण रुग्णालय मालवण वैद्यकीय अधिकारी डॉ बालाजी पाटील, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, बाबला पिंटो आदींनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शिबिर यशस्वी होण्यासाठी राधा केरकर, वृषाली धुरी, सुविधा तिनईकर, पल्लवी तारी, मीना घुर्ये, सिद्धी बांदेकर, ऋषा पाटील, लिशा कडू, करिश्मा देसाई, ऋतुजा देसाई, आशा देसाई, विकास पांचाळ, संतोष माणगावकर, अंकुश कातवणकर, दीपक ढोलम, निलेश गवंडी, अंकित शंकरदास, संदीप पेडणेकर, संदीप पाटील, सूर्यकांत कदम, बाबू डायस, संजय गावडे, हेमंत शिरगावकर, देवा तोडणकर, मयू पारकर, ललित चव्हाण, पपू वणकुद्रे, मंदार ओरसकर, बबन वाघ, रोहित गरगटे, तुषार मेस्त्री, मिलिंद कडू, विद्या मेस्त्री, हितेंद्र हिर्लोस्कर, राजु गिरकर, केदार देसाई, राजू कोवळे, अमित नाईक, केदार गरगटे, किरण रेडकर, कल्पेश पेडणेकर, रुपेश तायशेटे, अंकित कोवळे, दत्तप्रसाद वेर्लेकर यांचे सहकार्य लाभले. या जीवनदायी सोहळ्यात मातृत्व फाउंडेशन, लायन्स क्लब मालवण, रोटरी क्लब मालवण, धक्का मित्रमंडळ मालवण यांचे सहकार्य लाभले. यावेळी अनेक मान्यवर, शुभचिंतक उपस्थित होते. या शिबिरात प्रत्येक रक्तदात्यांला सन्मानचिन्ह व सन्मानपत्रक देऊन गौरविण्यात आले. महिलांचाही रक्तदानात उत्स्फूर्तपणे सहभाग लाभला.

टाइम्स स्पेशल

१ ऑक्टोबर या राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस निमित्त ग्लोबल रक्तदाते मार्फत संस्थेतील नियमित रक्तदात्यांना आदर्श ग्लोबल रक्तदाता पुरस्कार, आदर्श रक्तदाता कुटुंब, आदर्श रक्तदाता कपल, आदर्श रक्तदाता संस्था, आदर्श शिक्षक पुरस्कार ही देण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श रक्तदाता संस्था पुरस्कार यावेळी युवा विकास प्रतिष्ठान सांगेली, सावंतवाडी यांना देण्यात आला. आणि मालवण तालुक्यातील आदर्श रक्तदान संस्था पुरस्कार कमी तिथे आम्ही वायरी ग्रुप मालवण यांना देण्यात आला. आदर्श रक्तदान कपल पुरस्कार अमोल सावंत, सौ. गौरी सावंत, आदर्श रक्तदाता कुटुंब पुरस्कार राजा बटाव कुटुंबीय, आदर्श ग्लोबल रक्तविरांगना पुरस्कार सौ. राधिका गोविंद केरकर (तारकर्ली), आदर्श शिक्षक / शिक्षिका पुरस्कार सौ. सुविधा नरेंद्र तिनईकर (टोपीवाला हायस्कुल), अजय मधुकर यांनी (कुडाळकर हायस्कूल), आदर्श रक्तदाता पुरस्कार सांगेली ता. सावंतवाडी, कणकवली, मालवण मधील निःस्वार्थ रक्तदात्याना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच तहसीलदार श्रीमती वर्षा झाल्टे यांच्या उपस्थितीत जागतिक स्वैच्छिक रक्तदान दिना निमित्त उपस्थित रक्तदात्यांकडून रक्तदानाच्या प्रतिज्ञेचे वाचन करून घेण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg