loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प.मेर्वी शाळेत कांदळवन जनजागृती कार्यक्रम उत्साहात

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत वनविभाग कांदळवन, रत्नागिरी यांच्या वतीने वन्यजीव सप्ताह निमित्त वनक्षेत्रपाल किरण दौलत ठाकूर कांदळवन रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळवन परिसर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जि.प.मेर्वी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका संजया पावसकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, प्रकल्प समन्वयक ऋतुजा प्रकाश ठोंबरे , प्रकल्प सहाय्यक शुभम संजय पिलणकर आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली होती. प्रास्ताविकात उपस्थित मान्यवरांचा परिचय व कार्यक्रमाचा हेतू उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर यांनी विशद केला आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रभारी मुख्याध्यापिका संजया पावसकर यांनी करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमात प्रकल्प समन्वयक ऋतुजा ठोंबरे ,आणि प्रकल्प सहाय्यक शुभम पिलणकर यांनी लॅपटॉपच्या सहाय्याने कांदळवन वनस्पतीचा परिचय करून दिला.कांदळवन वनस्पतीचे महत्व, कांदळवनाचया प्रजाती ,कांदळवनात आढळणारे प्राणी ,पक्षी या विषयावर सविस्तर माहिती आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिली.पर्यावरणाचा समतोल राखणे आजच्या काळाची गरज आहे असे स्पष्ट प्रतिपादन समन्वयक ऋतुजा ठोंबरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका सौ.शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, उपशिक्षिका संजया पावसकर आदिंनी बहुमोल परिश्रम घेतले. शेवटी उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg