loader
Breaking News
Breaking News
Foto

निगुडे येथे घरावर विज कोसळून विद्युत मीटर जळून खाक

बांदा (प्रतिनिधी) - निगुडे गावठणवाडी येथील रवींद्र शशिकांत गावडे यांच्या घरावर विज कोसळून विद्युत मीटर सह घरातील सर्व विद्युत बोर्ड जळून खाक झाले. घर बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. विजेचा धक्का एवढा तीव्र होता की घरातील भिंतीलाही तडे गेले सदर घटना येथील संदेश गावडे यांनी आपले चुलत बंधू कुडाळ येथील रवींद्र गावडे यांना कळवल्यानंतर ते घरी आले असता संपूर्ण विद्युत यंत्रणा खाक झाली होती. सदर घटनास्थळी निगुडे वायरमन गुरुनाथ कुडव, निगुडे माजी सरपंच समीर गावडे व माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी धाव घेत पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच विद्युत कनिष्ठ अभियंता ठाकूर यांच्याशी चर्चा करण्यात आली व सदर विद्युत मीटर आहे त्याचा पंचनामा झाल्यानंतर विद्युत मीटर नवीन देण्यात येणार असे. ठाकूर यांनी सांगितले. तसेच गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे त्यामुळे यासंदर्भात महसूल यंत्रणा व कृषी विभाग यांनी पंचनामे करावे अशी मागणी माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg