loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत घरफोडी करणारे सराईत चोरटे गजाआड; चाळीस गुन्हे दाखल असलेले आरोपी अटकेत

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात ४ सप्टेंबर रोजी रात्री शिरोडा नाका, सर्वोदय नगर आणि शिक्षक कॉलनी परिसरात वेगवेगळ्या बिल्डिंगमधील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या घरफोडीमध्ये चोरट्यांनी तीस हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोटारसायकल चोरून नेली होती. ​निवृत्त शिक्षक रघुनाथ गवस यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हडळ आणि त्यांच्या पथकाने तांत्रिकदृष्ट्या तपास केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या तपासामध्ये घरफोड्या करणारे सराईत आरोपी सलीम महमद शेख (वय ३५, रा. महाड) आणि तौफिक मोहम्मद शेख (वय ३०, रा. चिकोडी, बेळगाव) यांना नवी मुंबई - महाड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. हे दोन्ही आरोपी आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्यांच्यावर कोल्हापूर, बेळगाव तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुमारे ४० पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ​ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री पंकज शिंदे करत आहेत. या अटकेमुळे सावंतवाडी परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांची मालिका उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg