मालवण (प्रतिनिधी) - जिल्ह्यात काम करत असताना माझ्या माणसांना वाईट वाटेल असे कधी वागू नको असे मला खास. नारायण राणे यांनी सांगितले आहे. त्यामुळे मी नेहमीच या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आदर ठेवतो. अनिल कांदळकर यांच्या सारखी निष्ठावान मंडळी १९९० सालपासून नारायण राणे यांच्या सोबत आहेत. माझ्या स्वभावामुळे माझ नुकसान होऊ नये यासाठीच माझा स्वभाव बदलावा म्हणून कांदळकर मला नेहमीच मार्गदर्शन करत राहिले. स्वभाव बदलण्याचे चांगले परिणाम आज दिसत आहेत. कांदळकर यांची वयाची शंभरी साजरी करण्याचीही संधी आम्हाला मिळो, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी येथे बोलताना केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती, मालवण पंचायत समितीचे माजी सभापती आणि मसदे विरण गावचे सुपुत्र यांचा ६७ वा वाढदिवस पोईप येथील इं.द.वर्दम हायस्कुल येथे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. यावेळी कांदळकर यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. खास. निलेश राणे यांच्या हस्ते कांदळकर यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, संजू परब, आनंद शिवलकर, राजा गावडे, गोपीनाथ पालव, पंकज वर्दम, शिवरामपंत पालव, संतोष साटविलकर, श्रीधर नाईक, पपू वराडकर, शाम वाक्कर, दीपक पाटकर, बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, मंदार लुडबे आदी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनिल कांदळकर यांना शुभेच्छा देताना दत्ता सामंत म्हणाले, अनिल कांदळकर हे नारायण राणे यांना मानणारे नेतृत्व आहे. राणे याच्या वाटचालीत प्रत्येक प्रसंगात अनिल कांदळकर कोणतीही अपेक्षा न करता उभे राहिले. आरक्षणा मुळे स्वतःला निवडणूक लढवता नाही आली तरी पक्षाने दिलेले उमेदवार स्वतः जबाबदारी घेऊन निवडून आणण्याचे काम कांदळकर यांनी केले, असे सांगत सामंत यांनी कांदळकर यांना शुभेच्छा दिल्या. तर राजन तेली यांनी १९९० पासून अनिल कांदळकर हे आपले सहकारी लाभले, आज पुन्हा आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगत कांदळकर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनिल कांदळकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या सोबत काम करायला मिळाले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करण्याचा मी नेहमी प्रयत्न केला. त्याचीच पोचपावती म्हणून नारायण राणे यांनी विविध पदे भूषविण्यासाठी मला संधी दिली. नारायण राणे यांच्या प्रमाणेच आज येथील जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडणारे आमदार निलेश राणे यांच्या रूपाने आपल्याला मिळाले आहेत. पोईप विरण परिसरात बेरोजगारीचा मोठा प्रश्न असून रोजगार संधीसाठी आमदारांनी प्रयत्न करावा. नारायण राणेनी जो कामांचा धडाका लावला होता तसाच धडाका आमदार निलेश राणे व दत्ता सामंत लावतील, अशी मला आशा आहे. आजच्या वाढदिवस कार्यक्रम निमित्ताने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न होतोय हे मला समजून येतेय, पक्षाने मी कोणतीही जबाबदारी दिल्यास ती पेलण्यास मी तयार आहे, असेही कांदळकर म्हणाले. अनिल कांदळकर यांच्या वाढदिवसानिमित्त पोईप व विरण गावात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्त हनुमान मंदिर, विरण येथे आज सकाळी रक्तदान शिबीर पार पडले. तसेच तसेच दुपारी इं. द. वर्दम हायस्कुल, पोईप येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले. या आरोग्य शिबिराचा गरजू व्यक्तींनी लाभ घेतला. तसेच हनुमान मंदिर विरण येथे रात्री जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळाचे शिव मंगळागौरी हे दशावतार नाटक सादर झाले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.