रत्नागिरी - क्रीडा व युवक सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा 2025/26 SVJTC क्रीडा संकुल डेरवण सावर्डे येथे 9/10 सप्टेंबर रोजी पार पडल्या. या शालेय स्पर्धेमध्ये SRK तायक्वांदो क्लबची खेळाडू आणि रत्नागिरीची सुवर्णकन्या स्वरा साखळकर हिने क्युरोगी प्रकारात अंडर 38 KG वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले. जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यामुळे 12/13 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर, जय किसान तरुण मंडळ वडणगे कोल्हापूर आयोजित शालेय विभागीय स्पर्धेत स्वरा ने आपला दबदबा कायम ठेवला. विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील 38 किलो वजनी गटामध्ये स्वरा विकास साखळकर हिने क्युरोगी प्रकारात सुवर्णपदक संपादन केले. या दोन्ही स्पर्धेसाठी स्वरा हिला SRK तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक शाहरुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विभागीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये शाहरुख सरांनी केलेली कोचिंग ही सुद्धा लक्षवेधी ठरली. स्वरा ही इयत्ता सहावी मध्ये शिकत असून रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक 15 दामले विद्यालय शाळेची विद्यार्थिनी आहे. शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत एक सुवर्णपदक तर विभागीय स्पर्धेत एक सुवर्णपदक असा दुहेरी सुवर्ण मुकुट मिळवणाऱ्या स्वरा हिची छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिने मिळवलेल्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप तालुका समन्वयक विनोद मयेकर महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेशराव कररा, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत मुख्याध्यापक, पालक, क्रीडाशिक्षक, संस्थेचे संचालक, तायक्वांदो क्लबचे सर्व पदाधिकारी, पालक यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.