loader
Breaking News
Breaking News
Foto

टी ई टी परिक्षा पास होणार नसल्याचे कारण देत आंबोली येथे मुख्याध्यापकाने घेतला गळफास

आंबोली (प्रतिनिधी) - आंबोली येथील गावठणवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असणारे आनंद सुरेश कदम (वय ३६) यांनी आपल्या राहत्या घरी गेळे कदमवाडी येथे शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्री कामावरून घरी गेलेल्या भावाने खिडकीतून बघितली दरवाजाला आतून कडी घालून गळफास अवस्तेत असल्याचे त्याने आंबोली पोलीस स्थानकात कळवले.यांनतर आंबोली पोलीस स्थानका चे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष गलोले, हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. घटनास्थळी एक चिट्टी सापडली त्यात त्याने मी "टी ई टी" परीक्षा पास होऊ शकत नाही असे लिहून ठेवले होते. दरम्यान त्यांचे आई वडील पुणे येथे होते तसेच पत्नी व ६ वर्षाचा मुलगा गडहिंग्लज येथे राहत होते त्यांना ही बोलवण्यात आले. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. जी.बी.सारंग आणि डॉ.महेश जाधव यांनी शव विच्छेदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान या घटनेनंतर आंबोली गेळे येथे हळहळ व्यक्त करण्यात आली. शिक्षक वर्ग,राजकीय पदाधिकारी,ग्रामस्थ,नातेवाईक मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. कदम सर हे स्वभावाने मन मिळाऊ, आणि शिक्षण प्रेमी होते. शिक्षकी पेक्षा मध्ये त्यांनी प्रामाणिक पणे काम केल्याने तसेच मन मिळाऊ स्वभावामुळे आणि शिक्षण सेवा वृत्ती चांगली असल्याने लोकामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनेश गावडे,संतोष पालेकर,सरपंच सागर ढोकरे,दिलीप सावंत,तातोबा गवस,बबन गावडे,गावठन वाडी मधील सर्व ग्रामस्थ,आंबोली,गेळे मधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सर्व राजकीय समाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg