loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या शिक्षण क्षेत्राला उजाळा देणारा सोहळा!

देवळे (प्रकाश चाळके) - मराठा विद्या प्रसारक मंडळी, दापोली यांच्या अंतर्गत कार्यरत मराठा मंदिर CBSE इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली ही शाळा आज खऱ्या अर्थाने अभिमानाने उजळली आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्यात शाळेला राज्यस्तरीय उत्कृष्ट शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या “रंगोत्सव सेलिब्रेशन 2025” या स्पर्धेमध्ये शाळेच्या 102 विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकांची कमाई केली. आणि आता या विद्यार्थ्यांची 11 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष अभिमानाची बाब म्हणजे या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे दापोली केंद्र मराठा मंदिर CBSE इंग्लिश मिडीयम स्कूल, दापोली असेल. दापोलीतूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होणार, ही शाळेसाठी गौरवाची आणि इतिहासात नोंद होणारी घटना आहे आणखी एक सुवर्ण क्षण म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक यांचे भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 साठी रत्नागिरी जिल्ह्यातून नामांकन झाले होते तसेच त्यांना नुकताच महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे ही बाब संपूर्ण संस्थेसाठी आणि दापोलीसाठी अभिमानाची बाब आहे ही सर्व यशोगाथा म्हणजे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे. या प्रवासात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक आभार. या यशस्वी वाटचालीत संस्थेचे अध्यक्ष माननीय दळवी सर्व विश्वस्त कार्यकारी मंडळ यांचा मोलाचा सहभाग आहे, असे ते म्हणाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg