मंडणगड- मला न्यायमूर्ती म्हणून २२ वर्ष झालीत. अनेक न्यायालयाच्या इमारती कामांना उपस्थित राहता आहे पण कोल्हापूर खंडपीठ आणि मंडणगड तालुका न्यायालय ही स्वप्नपूर्ती आहे. देशाच्या कोणत्याही तालुक्यात अशी इमारत नाही, असे प्रतिपपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश भूषण गवई यांनी येथे बोलताना सांगितले. आज रविवारी मंडणगड तालुका न्यायालय इमारत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्यायालय समोरील पुतळ्याचे अनावरण सरन्यायाधिश भूषण गवई यांच्या हस्ते झाले, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाबासाहेबांच्या घटनेमुळे देश प्रगतीपथावर आला असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
शेजारील इतर देशांबरोबर आपण तुलना करु शकतो ती बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे. सामाजिक व आर्थीक समता हाच लोकशाहीचा पाया आहे. न्याय दारात पोहोचला पाहिजे. शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहचवण्याची जबाबदारी सरकार व न्यायव्यवस्थेची आहे. अलिकडच्या काळात पीडब्लूडी दर्जेेदार कामे करीत आहे, याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.
ज्या कामगारांमुळे नवी इमारत उभी राहीली, त्या कामगारांचा सत्कार केला हे खर्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेेत असणारे काम आहे, असे सरन्यायाधिश भूषण गवई यांनी सांगितले. त्यांनी मंडणगड न्यायालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे होऊ शकले तसेच पालकमंत्री उदय सांमत यांच्याही विशेष कामगिरी बद्दली त्यांनी उल्लेख केला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.