loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरामवाडी, नांदोस, वराड येथील उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि उबाठा मालवण उपतालुका प्रमुख बाळ महाभोज यांच्यासह गुरामवाडी, नांदोस, वराड येथील उबाठा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. आमदार निलेश राणे यांनी गेल्या दहा महिन्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन व गांव विकासाचा दृष्टिकोन ठेवून शिवसेनेत पक्ष करतं असल्याचे प्रवेशकर्ते यांनी सांगितले. सोबतच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे सातत्याने गावागावातील जनतेच्या संपर्कात असणारे नेतृत्व आहे. त्यांच्याकडे प्रश्न मांडला की तो प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागतो. विकासकामे पुर्ण होतात. याचं कार्य पद्धतीवर प्रेरित होऊन पक्ष प्रवेश करतं असल्याचे प्रवेशकर्ते यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी राजा गावडे जिप माजी सभापती संतोष साटविलकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, गुरामवाडी सरपंच शेखर पेणकर, पेंडूर जिप विभाग प्रमुख राजन माणगांवकर, वराड शिवसेना गांवप्रमुख बबन पांचाळ, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, संतोष पालव, महेश बागवे, सुशांत घाडीगावकर, दिलीप बिरमोळे, वायरी विभागप्रमुख मंदार लुडबे, शानू वालावलकर यांसह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उबाठाचे शिवसैनिक राजेंद्र कांबळी, प्रमोद कांबळी, राधाकृष्ण महाभोज, बाबू मालवणकर, दिपक गुराम, साबाजी गुराम, अक्षय गुराम, ओंकार लाड, नांदोस गडकरवाडी उबाठा माजी शाखा प्रमुख सुभाष ठोंबरे, चंद्रकांत कोंडसकर, सुभाष घावरे, विनोद पार्टे, संजय मिठबावकर, प्रकाश खोत, मुकुंद भोसले, तेजस हरचांदे, जनार्दन भोसले, शशिकांत पार्टे, अविनाश पार्टे, अरुण इंदूलकर, सुरेश इंदूलकर, वराड उबाठा शाखाप्रमुख किशोर भगत, शाखा प्रमुख आप्पा आळवे, मोहन आळवे, नितीन नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg