loader
Breaking News
Breaking News
Foto

बावाशेठ मित्र मंडळातर्फे आयोजीत भोंडला स्पर्धेत अपेक्षा सदरे प्रथम

खेड (प्रतिनिधी)- हॉटेल विष्णूलीला चिंचघर येथे बावाशेठ मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या भोंडला स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेचे नवरात्रीत आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेला महिला वर्गाकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. सदर भोंडला स्पर्धेत प्रथम क्रमांक अपेक्षा अनिल सदरे, व्दितीय क्रमांक प्रज्ञा प्रभाकर कोळेकर तर तृतीय क्रमांक अर्चना संदेश चव्हाण यांनी पटकावला. स्पर्धेतील यशस्वी महिलांना मंडळाचे अध्यक्ष रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण यांच्या शुभहस्ते आकर्षक भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षिका वनिता पवार, प्रज्ञा कोळेकर, अपेक्षा सदरे, सूर्यकांत साळवी, प्रभाकर कोळेकर, अनिल सदरे, विनय माळी यांनी मनोगत व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कार्यक्रमाचे आयोजन जागतिक बालिका दिनी केलेले असल्याने अध्यक्ष बावाशेठ चव्हाण यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कुमारी मुक्ता भोसले हिचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव केला. भोंडला स्पर्धेचे परीक्षक म्हणून बावाशेठ मित्र मंडळाचे सदस्य व कलाकार विनय माळी यांनी उत्तम कामगिरी बजावली. तसेच या स्पर्धेतील सर्व बक्षिसे अनिल मोरे यांनी प्रायोजीत केली होती. मंडळाचे अध्यक्ष बावाशेठ चव्हाण यांनी आपल्या भाषणात यशस्वी महिला स्पर्धकांचे अभिनंदन केले तसेच त्यांनी स्पर्धेचे उत्तम आयोजन केल्याबद्दल मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. सदर बक्षीस वितरण कार्यक्रमास बावाशेठ मित्र मंडळाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल मोरे यांनी केले तर आभार अनिल सदरे यांनी मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg