loader
Breaking News
Breaking News
Foto

फटाके न फोडता इतरांना मदत करु या, दिवाळीचा आनंद लुटूया : युयूत्सू आर्ते

देवरुख - फटाके न वाजविता जे पैसे उरतील त्या पैशातून खाणे, पिणे, पर्यटनाचा आनंद, गरजूंना मदत, विविध सामाजिक कामात मदत, परिसरात राहणार्‍या गरिब जनतेला मदत करुया आणि दिवाळीचा आनंद लुटूया, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते युयूत्सू आर्ते यांनी केले आहे. आजच्या स्पर्धेच्या जगात लोकांना आता जाणीव झाली आहे की, फटाके फोडणे म्हणजे पैसे जाळणे. त्यामुळे फटाके न फोडता पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यास, गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यास मदतरुपी होऊया. प्रदूषणमुक्त, अपघातमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन युयूत्सू आर्ते यांनी केले आहे. आपल्या आजूबाजूला वाडीवस्तीत फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण होतेच पण वायूप्रदूषणामुळे वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ध्वनीप्रदूषण, हवाप्रदूषण, अपघात होणे, आग लागणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, आजारी पडणे हे टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी जनतेने साजरी करावी आणि राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा, असे आवाहन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते युयूत्सू आर्ते यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg