loader
Breaking News
Breaking News
Foto

वसंत गावकर यांची शिवसेनेच्या मालवण शहर मच्छिमार सेल अध्यक्षपदी नियुक्ती

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील धुरीवाडा येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते वसंत देवेंद्र गावकर यांची शिवसेनेच्या मालवण शहर मच्छिमार सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही निवड जाहीर केली. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते वसंत गावकर यांना नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. वसंत गावकर यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवसेनेच मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हयाच्या शिवसेना कार्यकारणीच्या मालवण शहर मच्छिमार सेल अध्यक्षपदी वसंत देवेंद्र गावंकर आपली नियुक्ती करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वाना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, शहर संघटक राजू बिडये, भाऊ मोरजे, वायरी विभागप्रमुख मंदार लुडबे, बाबू धुरी, महेश सारंग, आबा शिर्सेकर, शिवाजी केळूस्कर, संदीप धुरी, दत्ता केळूसकर, नागेश वेंगुर्लेकर, गणेश परब, एकनाथ मोहिते, सिद्धेश पाताडे, किरण जोगी, गौरव सावबा, गजानन पराडकर, गीतेश पराडकर, विश्वजित मंचेकर, शुभम सावंत, प्रथम सारंग, अनिकेत खडपकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg