loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवा शहरात भरदिवसा घरफोडी; साडे आठ लाखांचे दागिने लंपास

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलिस आयुक्तालयातील दिवा पूर्व परिसरात दिवसाढवळ्या घरफोडी करून चोरट्याने तब्बल ८ लाख ३१ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पुन्हा चोरट्याने पोलिसांना आव्हान दिले आहे. मुंब्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा आगासन रोडवरील एकविरा गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणारे पांडुरंग बाबू शेळके (वय ४९) हे ५ मे रोजी पहाटे कामावर गेले. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नीने घराला कुलूप लावून कामासाठी घर सोडले. दुपारी सुमारे ३.१५ वाजता त्यांच्या पत्नी घरी परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. माहिती मिळताच पांडुरंग घरी पोहोचले. पाहणी केली असता किचनमधील लोखंडी कपाटाचे लॉकर आणि ड्रॉवर तुटलेले आढळले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच बाथरूमच्या खिडकीची काच काढून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे तक्रारीत म्हटले आले. याचदरम्यान चोरट्याने घरातील मंगळसूत्र, विविध सोन्याच्या चेन, कानातील दागिने आणि अंगठी असा एकूण ८.३१ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg