loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्नीने भेट नाकारल्याने तरुणाची आंबोली मुख्य धबधब्याच्या खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या

​सावंतवाडी (प्रतिनिधी): आंबोली गावठाणवाडी येथील राजाराम रघुनाथ कुरतडकर (वय २९) या तरुणाने आंबोली मुख्य धबधब्यापासून जवळच असलेल्या खोल दरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पत्नीने भेट नाकारल्याच्या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्रीपासून बेपत्ता असलेल्या राजारामचा मृतदेह मंगळवारी दुपारी २५० ते ३०० फूट खोल दरीत आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम याचा विवाह ५ वर्षांपूर्वी सांगेली येथील एका मुलीशी झाला होता. मात्र, राजारामला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे वर्षभरातच त्यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. सध्या त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, पत्नीचे दुसरे लग्न जमवले जात असल्याची माहिती राजारामला मिळाली होती. याच कारणावरून काल, ११ मे रोजी तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी सांगेली येथे गेला होता. मात्र, तिने भेटण्यास नकार दिल्याने तो निराश होऊन आपल्या मोटारसायकलने आंबोलीच्या दिशेने परतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजाराम रात्री उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. सकाळी आंबोली मुख्य धबधब्यापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर त्याची मोटारसायकल उभी असल्याचे काही परिचितांना दिसून आले. मोटारसायकलला चावी असल्याने त्यांनी ती घरी नेऊन दिली, मात्र राजाराम घरी नसल्याचे समजताच संशय बळावला. घटनेची माहिती मिळताच 'सह्याद्री ॲडव्हेंचर्स अँड रेस्क्यू टीम'ला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने अत्याधुनिक कॅमेरा आणि ड्रोनच्या साहाय्याने दरीत शोधमोहीम राबवली. यावेळी सुमारे २५० ते ३०० फूट खोल दरीत राजारामचा मृतदेह दिसून आला. रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अथक परिश्रमानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आंबोली पोलीस दूरक्षेत्रात सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg