loader
Breaking News
Breaking News
Foto

अवकाळी पावसाने लांजा तालुक्याला मोठा फटका

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - शनिवारी तालुक्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे तातडीने हाती घेण्यात आले आहेत. प्राथमिक आकडेवारीनुसार तालुक्यात एकूण ३४ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वादळी पावसात तालुक्यात २३४ घरांचे नुकसान झाले असून २३ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. तसेच दोन दुधाळ जनावरे दगावली आहेत. सार्वजनिक मालमत्तेलाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये २ ग्रामपंचायत कार्यालये, ९ जिल्हा परिषद शाळा, १ अंगणवाडी, १ स्मशान शेड, १ शौचालय, १ कुक्कुटपालन संस्था तसेच १ प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुकसान झाले आहे. तर खासगी मालमत्तेमध्ये २ दुकाने, ४ शौचालये, १ नर्सरी, १ पाण्याची टाकी आणि १ अंगण मंडपाचे नुकसान झाले आहे. याशिवाय ६ घरकुलांना तसेच ३ मंदिरांनाही फटका बसला आहे. अशाप्रकारे तालुक्यात एकूण ३४ लाख ३० हजार १७५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

टाइम्स स्पेशल

विशेष म्हणजे वाडीलिंबू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून ते तालुक्यातील सर्वाधिक नुकसान ठरले आहे. तर उपळे येथील नारायण काना बदड यांच्या घराचे सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, महसूल विभागाने तालुक्यातील सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात आले असून संबंधित आकडेवारी लांजा तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg