loader
Breaking News
Breaking News
Foto

​सोनुर्लीत खासगी क्रशरसाठीच्या ११ केव्ही विद्युत वाहिनीला ग्रामसभेचा तीव्र विरोध; काम थांबविण्याचा एकमुखी ठराव

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ग्रामपंचायत प्रशासन किंवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता सोनुर्ली गावातून एका खासगी क्रशरसाठी ११ केव्ही विद्युत वाहिनी टाकण्याचे काम वीज वितरण कंपनीने सुरू केले आहे. ठेकेदाराकडून सुरू असलेले हे मनमानी काम संबंधित विभागाने त्वरित थांबवावे, अन्यथा गावाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा आक्रमक पवित्रा सोमवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय हे काम करू नये, असा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला. ​सोनुर्ली ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच नारायण हिराप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंच भरत गावकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत विद्युत वाहिनीचा मुद्दा चांगलाच गाजला. एका खासगी क्रशरला वीज पुरवठा करण्यासाठी ही वाहिनी टाकली जात असून, ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच याला विरोध दर्शविला आहे. असे असतानाही, ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी किंवा 'ना हरकत दाखला' न घेता हे काम रेटले जात असल्याचे चर्चेतून समोर आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर विद्युत वाहिनीचा गावाला कोणताही उपयोग नसून, ज्या जमिनीतून किंवा रस्त्याच्या कडेने ही लाईन जाणार आहे, त्या भागातील शेतजमीन धोक्यात येणार आहे. या परिसरात ग्रामस्थांचा मोठा वावर असतो, त्यामुळे भविष्यात जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे ही वाहिनी गावातून नेण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने वीज वितरण कंपनी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे यापूर्वीच लेखी पत्रव्यवहार केला आहे, मात्र अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. वीज अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहमतीनेच काम करू असे आश्वासन दिले असतानाही, काम पूर्ण करण्याचा घाट घातला जात आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला असून गावाच्या हितासाठी असा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

टाइम्स स्पेशल

​संबधित ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी असल्याचे सांगत आहे, मात्र भविष्यात काही अपघात झाल्यास बांधकाम विभाग जबाबदारी घेणार का? असा सवालही यावेळी विचारण्यात आला. यासंदर्भात आता बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आमदार आणि पोलीस प्रशासनाला लेखी पत्र देऊन कळविण्यात येणार आहे. तरीही मनमानी पद्धतीने काम सुरू राहिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सोनुर्ली ग्रामस्थांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg