loader
Breaking News
Breaking News
Foto

तिथवली-नाऊळदेवाडी येथे वीज खांब वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटून अपघात

वैभववाडी (प्रतिनिधी) - खारेपाटण-कोल्हापूर मार्गावर तिथवली-नाऊळदेवाडी येथे वीज खांब वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटून अपघात झाला. यात दोन कामगार जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार बारामती येथून वीज खांब घेऊन एक टेम्पो खारेपाटणच्या दिशेने निघाला होता. टेम्पोमध्ये वीज खांबासह तब्बल सात कामगार प्रवास करत होते. तिथवली-नाऊळदेवाडी येथे आल्यानंतर अचानक टेम्पोचा टायर फुटला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला पलटी झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात दोन कामगार जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सुदैवाने मोठे जीवितहानी टळली. दरम्यान टेम्पोमधून वीज खांबासारख्या जड साहित्याची वाहतूक सुरू असताना त्याच वाहनातून कामगारांची वाहतूक केली जात होती. तसेच वाहनाचे टायर वापरण्यास अयोग्य स्थितीचे होते. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शीय म्हणणे आहे. टेम्पो चालकाचा बेफिकीरपणा कामगारांच्या जीवावर बेतला असता. मात्र सुदैवाने मोठी हानी टळली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg