loader
Breaking News
Breaking News
Foto

कोलगावचा त्रैवार्षिक पडली उत्सव उत्साहात

सावंतवाडी : कोलगावचे ग्रामदैवत श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानचा त्रैवार्षिक पडली उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेले पाच दिवस हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. आज सायंकाळी पडलीसह महादेवाचे केरवडे येथे प्रस्थान करत उत्सवाचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गेले पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी कुळघर चंदन धुरी यांच्या घराकडून तरंगकाठीसह वाजत गाजत श्री देवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवारी श्रीदेवी सातेरी मंदिराकडून अंधार व तरंगकाठीसह चव्हाटा येथे श्री दिर्बाई देवीच्या भेटीसाठी प्रस्थान झाले. त्याठिकाणी धार्मिक विधी मानपान व नवसफेड कार्यक्रम संपन्न झाले. शेकडो भाविकांनी रात्री महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर श्री दिर्बाई देवी मंदिराकडून अंधार व तरंगकाठीसह चव्हाटा मंदिराकडे प्रस्थान झाली. शनिवार धार्मिक विधी पार पडले. रविवारी भाविकांचा पडलीत ओटी भरण्याचा कार्यक्रम, अंधारांना हाक मारणे, भाविकांची गाऱ्हाणी व नवस बोलणे, रविवार सर्व अंधाराना हाक मारणे व ओटी भरणे नवस बोलणे आदी कार्यक्रम संपन्न झाले.

टाइम्स स्पेशल

आज शेवटच्या दिवशी सकाळपासून ओटी भरणे, अंधाराना हाक मारणे व रयतेला आशीर्वाद आदी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी दादासाहेब सावंत (कोलगाव - पुणेकर) यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी अंधाराना हाक मारत कुणकेरी मार्गे ही पडली महादेवाचे केरवडे येथे प्रस्थान झाली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी श्री देवी सातेरी देवस्थान कमिटीचे पदाधिकारी, सदस्य व कोलगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg