खेड - खेड नगरपरिषद चे विद्यमान नगरसेवक रहिमभाई सहिबोले (गट नेता भारतीय जनता पार्टी) व अनिल भेकरे अँड सन्स पुरस्कृत, दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 17 मे रोजी खेड नगरपरिषदच्या नवीन मैदानावरती महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन व खेळाचे व्यासपीठ मिळावे या करीता निमंत्रीत जिल्हा रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर संघाची भव्य दिव्य तिरंगी लढत रत्नागिरी कोकण चषक 2026 या दिव्यांग खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे.
दिव्यांग व्यक्तीप्रति आदर व दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या करिता एक सामाजिक बांधिलकी म्हणून श्री.संतसेना नाभिक व्यावसाईक पतसंस्था भरणे यांचे चेअरमन महादेव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तांबे यांच्या वतीने या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा संघातील खेळाडूना खेळाचा ड्रेस, तसेच कोकण रत्न नागरी सहकारी पतसंस्था संस्था खेड यांचे अध्यक्ष. उमेश नक्षे याच्याकडून सहभागी होण्याऱ्या प्रत्येक जिल्हा संघातील दिव्यांग खेळाडूंना सन्मानचिन्ह आमिर हमदुले, रोशन भैरवकर यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी चषक प्रदान करण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्हा संघ पुढील प्रमाणे कर्णधारपदी अष्टपैलू खेळाडू मंदार खैर, उपकर्णधार एकनाथ जोशी, खेळाडू अल्पेश तावडे, दिपक फुटक, अमित डेरवणकर, सुफियान तांबे, मंगेश चांदणे, सचिन पवार, अमित फिलसे, अजिंक्य तांबे, चांगदेव शिरथर, अंकुश पेवेकर, भरत आलीम, टीम मॅनेजर जनार्धन पवार, संतोष मालशे यांची निवड करण्यात आली आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.